महाराष्ट्र

ईद – उल – अजहा ( बकरी ईद ) परिसरातील गावात सामुहिक नमाज पठण व पावसासाठी प्रार्थनेने साजरी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

ईद – उल – अजहा ( बकरी ईद ) परिसरातील गावात सामुहिक नमाज पठण व प्रार्थनेने संपन्न झाली. यावेळी राज्यात व परीसरात धो धो पाऊस पडूदे शेतकरी व नागरिकांवर आलेले संकट टळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच सर्वत्र समाधानकारख पाऊस पडून शेती शिवार फुलून आर्थिक स्थैर्य लाभावे, त्यासाठी गावोगावी ईदच्या नमाजपठणा नंतर प्रार्थना करण्यात आली.

नीरा नरसिंहपूर परिसरात ईद उल- – अजहा (बकरी ईद) निमित्त पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण व प्रार्थना केली. तर मौलाना तय्यब शेख, ताजुद्दीन शेख, नबीलाल शेख, मेंबर दादाभाई शेख आदींनी पावसाच्या प्रार्थनेचे विशेष आयोजन केले होते. बावडा येथील ईदगाह मैदानात मौलाना जिब्राईल यांनी नमाज पठण, बयान व प्रार्थना केली.

लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर मौलाना अफरोज रजा यांनी उपस्थित समाज बांधवांना नमाज पठण व प्रार्थना केली. त्यानंतर हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये मजारवर फुलांची चादर घालून सामुहिक प्रार्थना व सलाम म्हणण्यात आला.

दरम्यान बावडा क्षेत्र पोलीसांच्या वतीने बावडा, लुमेवाडी सह इतर गावात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी. शिंदे, सुनिल कदम, हवालदार जगन्नाथ कळसाईत, अमोल गायकवाड आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button