शहर

सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड इन्चार्ज असलेल्या केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत गुरे चोरांचा धुमाकूळ.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक .7030516640.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील उसरणी गावातील सेंद्रिय शेती खताचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या घरी गुरे चोरांनी दुसऱ्यांदा चोरी करून सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड इन्चार्ज असलेल्या केळवा पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घातला आहे.

उसरणी गावातील अनुजा सचिन पाटील या महिलेचा उसरणी गावात सेंद्रिय शेती खताचा व्यवसाय आहे.
या महिलेच्या घरी 18 नोव्हेंबर 2021 रोजी अज्ञात चोरांनी पहिल्या चोरीच्या वेळी दोन बैल आणि 1 गाय अशी चोरी केली होती.

या चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आले होते तर एक आरोपी आज-तगायत फरार असताना 16 सप्टेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा याच महिलेच्या घरातील दोन वासरांची चोरी करून गुरे चोरांनी ही वासरे गावाबाहेर कत्तल करून त्यांचे मास घेऊन हे गुरे चोर फरार झाले आहेत.

याबाबत उसरणी गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती सदस्य यांनी घटनास्थळी पाहणी केली असून या याबाबत अनुजा पाटील यांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button