शहर

विक्रमगड नगरपंचायत मध्ये अग्निशामक (फायरब्रिगेड) दलाची बाईक दाखल

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायत मध्ये १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नगरपंचायत विक्रमगड येथे अग्निशामक (फायरब्रिगेड) दलाची बाईक नगरपंचायत विक्रमगड मध्ये दाखल झाली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अग्निशामक दलाची बाईक (मोटरसायकल) याचे उद्घाटन विक्रमगडचे नगराध्यक्ष मा.श्री.निलेश पडवळे (पिंका) यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी या कार्यक्रमाला विक्रमगड नगरपंचायतचे मुख्याधिकारी मा.श्री.अजय साबळे साहेब व विक्रमगडचे उपनगराध्यक्ष मा.श्री.महेंद्र पाटील व पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर सांबरे विक्रमगड नगरपंचायतचे नगरसेवक श्री. मनोज वाघ, श्री.अमोल भडांगे, श्री.निकेत पडवळे व रिपाईचे कार्यकर्ते श्री.राहुल मोरे व विक्रमगडचे नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button