वंचित बहुजन आघाडीचे विजय कोकणे यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
वंचित बहुजन आघाडीची” विजय कोकणे “यांच्या सतर्कतेमुळे ऐन आषाढी वारी पालखी सोहळ्यातील जीवित आणि टळली असून त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 24 जून 2023 रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज मुक्कामी असून लाखो भाविक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत त्या अनुषंगाने
मसुद मळा (कर्मवीर चौक )येथे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार निधीतून एक हायमश्ट लाईटीचा खांब असून त्या हायमश्ट मुळे या परिसरात लख्ख प्रकाश पडतो मात्र आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक पाळीव कुत्रा या हायमश्ट खांबाजवळ गेला असता त्याला त्या हायमश्ट खांबाचा करंट लागल्याने तो जोरात केकाळला त्या नंतर तो विव्हळत तेथेच पडल्याने जवळच थांबलेल्या विजय कोकणे यांचे लक्ष गेल्याने तात्काळ अकलूज नगर परिषदेच्या वायरमन ला संपर्क साधून ते दुरुस्त करून घेतले अन्यथा हजारोंच्या संख्येने पालखी सोहळ्या मधील एखाद्या नागरिकाला लाईट चे करंट लागून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे विजय कोकणे यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे



