पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या…

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत
माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशान्वये पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळ यांच्या मान्यतेने पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे दिनांक 30 जून 2023 पासून बदली आदेश जारी केली आहेत.
या आदेशामध्ये डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव विठ्ठल बंडगर यांची बदली कासा पोलीस ठाणे तर विक्रमगड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप रामनाथ गीते यांची बदली वाडा पोलीस ठाणे तर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश विष्णू शिवरकर यांची बदली मनोर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर गजानन संख्ये यांची बदली डहाणू पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
तर मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक उमेश मनोहर पाटील यांची बदली बोईसर पोलीस ठाणे तर नियंत्रण कक्ष पालघर पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे यांची बदली मोखाडा पोलीस ठाणे तर बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश पांडुरंग साळुंखे यांची बदली तारापूर पोलीस ठाणे तर मोखाडा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांची बदली जव्हार पोलीस ठाणे तर घोलवड प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अच्युत पारखे यांची बदली विक्रमगड पोलीस ठाणे तर नवी मुंबई येथील पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बाजीराव किंद्रे यांची बदली पालघर प्रभारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
तर कोर्ट पैरवी अधिकारी पालघर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मोतीराम गवई यांची बदली बोईसर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.तर नियंत्रण कक्ष पालघर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास हनुमंतराव खरमाटे यांची बदली वाडा पोलीस ठाण्यात तर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भाईदास अहिराव यांची बदली बोईसर पोलीस ठाणे तर नियंत्रण कक्ष पालघर पोलीस उपनिरीक्षक अनिल पांडुरंग दिघोळे यांची बदली जव्हार पोलीस ठाणे तर तारापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश अशोक जाधव यांची बदली बोईसर पोलीस ठाणे
तर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र एकनाथ पाटील यांची बदली पालघर पोलीस ठाणे तर पोलीस उपनिरीक्षक नामदेव विष्णू जाधव यांची बदली तारापूर पोलीस ठाणे तर पोलीस उपनिरीक्षक धनराज बाबूलाल शिरसाट यांची बदली बोईसर पोलीस ठाणे तर पालघर महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया वाल्मीक मांढरे यांची बदली बोईसर पोलीस ठाणे तर सातपाटी पोलीस उपनिरीक्षक मयुरेश नामदेव अंबाजी यांची बदली वाडा पोलीस ठाणे तर बोईसर पोलीस उपनिरीक्षक विजय साहेबराव डाखोरे यांची बदली वाडा पोलीस ठाणे तर डहाणू महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता भाऊसाहेब सांगळे यांची बदली पालघर पोलीस ठाणे तर घोलवड पोलीस उपनिरीक्षक मयूर बाळासाहेब शेवाळे यांची बदली तलासरी पोलीस ठाणे तर वाडा पोलीस उपनिरीक्षक प्रदीप समाधान बोदेड यांची बदली सातपाटी पोलीस ठाणे तर वाडा पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिताराम पवार यांची बदली केळवा सागरी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे..



