महाराष्ट्र

पुणे विभागीय मराठा सेवा संघाच्या सचिव पदी -वनिता कोरटकर यांची निवड

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेठवर्क
मो. 9730 868 458

मराठा सेवा संघ पुणे विभागाची केंद्रीय कार्यकारिणीची सभा सातारा येथे संपन्न होऊन सदर सभेत अकलूज तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्त्या व माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुकाध्यक्ष सौभाग्यवती वनिता कोरटकर यांची मराठा सेवा संघाच्या पुणे विभागीय सचिव पदी निवड करण्यात आली सदर निवडीनंतर अकलूज तालुका माळशिरस येथे पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने,

कार्याध्यक्ष रवींद्र पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र मोहिते, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मनोरमा लावंड, शहराध्यक्ष शुभांगी क्षीरसागर, सचिव शारदा चव्हाण, पंचायत समिती माळशिरस चे कृषी अधिकारी नितीन चव्हाण यांनी कोरटकर यांचा त्यांचे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सत्कार करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button