करमाळ्यात मोहरम सण उत्साहात साजरा,मोहरम उत्सवात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहरांमधून निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीला मोहरम सणाच्या मिरवणुकी मधून मुस्लिम समाजाच्या अध्यक्षांनी दिले मोकळा करून मार्ग
करमाळा शहरात मोहरमचा सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला दिनांक सात जुलै रोजी शहरातील भुईकोट किल्ल्यात मानाची नालसाहेब सवारी तर बारा जुलै रोजी कुंभारवाडा येथील अल्लाउद्दीन साहेब सवारी मोहिदिन तालीम येथील सवारी पंजाब वस्ताद चौक येथीलकुरेशी यांची सवारी सुतार तालीम येथील पाच पंजे सवारी खाटीक गल्ली येथील नाले हैदर सवारी भवानी पेठेतील लालन साहेब सवारी मौहला गल्ली येथील फरीद मास्तर सवारी रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी खडकपुरा येथील माहुले यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी समाजाची सवारी आदी ठिकाणी सवारी ची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच डोलेही बसवण्यात आले होते दिनांक 13 जुलै ते 17 जुलै या काळात सर्व सवारी ची शांततेत शहरातुन मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये भुईकोट किल्ले येथील मानाची नाल साहेब यांची सवारी आज सकाळी नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत मिरवणूक निघून शहरातील सर्व सवारीला भेटुन दुपारी किल्ला वेस येथे मिरवणूक संपली तसेच कुंभारवाडा येथील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य म्हणून समजले जाणारी कुंभार समाजाची सवारी दुपारी बारा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून दुपारी किल्ला वेस बारवे जवळ मिरवणूक संपली
सदर मोहरम सण यशस्वी करण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे माजी नगरसेवक फारूक जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख मोहरम कमिटीचे सदस्य जाकीर वस्ताद जाफर घोडके राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष सोहेल पठाण हाजी समीर शेख आलीम शेख अरबाज बेग मुस्तकिन पठाण समीर शेख, शाहरूख शेख सुर्यकांत चिवटे मोहन परदेशी उमर मदारी मोहम्मदहाफिज कुरेशी बबन दुधाट दस्तगीर पठाण, माहुले, हलवाई आदी जणांनी परिश्रम घेतले त्यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे गणेश दळवी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता

मोहरम सणानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन घडवणारे एक वेगळे चित्र आज मोहरम सणांमध्ये दिसून आले यामध्ये करमाळा शहरातील मुख्य मानाची सवारी नाल साहब ची मिरवणूक निघाली असता सुभाष चौक येथे भर मिरवणुकीमध्ये अचानकपणे आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहरातून पालखी आली असता मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांनी सदर पालखीला मोहरम सवारी च्या मिरवणुकी मधून मार्ग मोकळा करून दिला सदर घटनेमधून करमाळा शहरात आजही हिंदू मुस्लिम ऐक्याचे आगळे वेगळे दर्शन पहावयास मिळाले



