शहर

मनोरमा लावंड यांचा दीपस्तंभ नारी पुरस्काराने सन्मान

अकलूज–डी.एस.गायकवाड

जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा मनोरमा लावंड यांच्या कार्यकर्तूत्वाची दखल घेत सातारा येथे नुकतेच त्यांना दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सातारा येथील ध्यास फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही या सन्मान सोहळ्याचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माळशिरस तालुक्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मनोरमा लावंड यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सरपंच नाथा कदम, ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ओतारी, सचिव सचिन कांबळे, ॲड. सुरेश रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सरस्वती वशिवळे, डॉ.अरुणा बर्गे, वैशाली माळी, रेखा नंदीवाले, ॲड साधना माने, मनोरमा लावंड, स्वरूपा पोरे, आशा बोडस,दिपाली महामुनी आदि महिलांचा सन्मान करण्यात आला.हॉटेल गुलबहार पवई नाका सातारा येथे हा कार्यक्रम पार पडला. पुरस्कार मिळाल्याने मनोरमा लावंड यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button