महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यातील तरूणांना उद्योग, व्यवसाय उभारणीस आर्थिक मदत – भाजपाचे प्रदेश निमंत्रक दिपक काटे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

इंदापूर तालुक्यातील तरूणांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून वित्त पुरवठा करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे नवनियुक्त प्रदेश निमंत्रित सदस्य दिपक काटे यांनी केले.

गणेशवाडी ( ता. इंदापूर ) येथे भाजपाच्या प्रदेश निमंत्रित सदस्यपदी दिपक काटे यांची नियुक्ती बद्दल त्यांचा दत्ता घोगरे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी किरण भोसले, नामदेव घोगरे, शितल मोहिते, महादेव सुर्यवंशी, बाळासाहेब घोगरे, विठ्ठल घोगरे, किशोर खटके, निलेश बोडके, कांतीलाल घोगरे, मयुर घोगरे, कृष्णा पाटील, दत्तात्रय घोगरे, फणिंद्र कांबळे, दुर्योधन शेंडगे, संजय घोगरे, वसंत तावरे उपस्थित होते.

दिपक काटे बोलताना पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अठरा पगड बारा बलूतेदारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. त्यातून ग्रामीण भागातील तरूणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहे. त्यासाठी तरूणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिपक काटे यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय घोगरे यांनी केले. सुत्रसंचलन अक्षय घोगरे यांनी तर आभार विठ्ठल घोगरे यांनी मानले. यावेळी दुर्योधन शेंडगे यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button