महाराष्ट्र

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे अवैध बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल विभागातील जबाबदार व पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करावा —-अश्वजीत कांबळे

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

  • पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) गावातील गट नं. २४८/३, गायरान गट नं. २४६ / १ मधील करोडो रुपयांचा बेकायदेशीर अवैध मुरूम उत्खनन करून चोरून नेला आहे. दिवसाढवळ्या प्रशासनाच्या समक्ष राजरोसपणे सदर प्रकार चालू आहे. नियमबाह्य बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल कर्मचारी, अधिकारी व पोलिस पाटील यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्वजित सिध्देश्वर कांबळे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  • सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) गावातील गट नं. २४८/३, गायरान गट नं. २४६ / १ मधील करोडो रुपयांचा बेकायदेशीर अवैध मुरूम उत्खनन करून ओझरे ते गोंदी रस्त्यास वापरण्यात आलेला आहे. पिंपरी बुद्रुकचे तलाठी, तत्कालीन मंडल अधिकारी, तालुका दंडाधिकारी तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा अवैध मुरूम उत्खनन व विक्री खुलेआम करण्यात आली आहे.
    पिंपरी बुद्रुकचे तलाठी, पोलिस पाटील व पोलिस प्रशासनाची यास मुक संमती असल्याचे दिसत आहे. संबंधीतांना राजकीय दबावापोटी व आर्थिक तडजोडीमुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. लुटूपूटूची कारवाई दाखवून वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात येत आहे. संबंधित इसम निलेश मच्छिंद्र बोडके व कंन्स्ट्रक्शन कंपनीवर अवैध गौण खनिज चोरीचे दखलपात्र गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच सदर इसमांवर चौकशीअंती कारवाई न झालेस तहसिल कार्यालय, इंदापूर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन अथवा लाक्षणिक उपोषणाचा इशारा अश्वजित कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर फुलारी, प्रांताधिकारी बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक पवार आदिंना देण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button