महाराष्ट्र

प्रकल्प माळशिरस अकलूज (ग्रामीण )पंचायत समिती माळशिरस अंतर्गत अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसची रिक्त पदे भरण्याचे आदेश.

उपसंपादक हुसेन मुलाणी

मा.आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे दि.२७/०३/२०२३ चे पत्रान्वये अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/मदतनीस भरतीस स्थगीती देण्यात आलेली होती. सदर स्थगिती मिळालेली अंगणवाडी पदभरतीस मा.आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नबी मुंबई यांचे पत्र दि.२७/०४/२०२२ अन्वये अंगणवाडी सेविकांची पदे भरु नये,

तसेच मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस ची सर्व रिक्‍त पदे तात्काळ भरणेबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्याअन्वये प्रकल्प माळशिरस (ग्रामीण) व प्रकल्प अकलुज (ग्रामीण) पंचायत समिती माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापुर अंतर्गत रिक्‍त मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२३ सुरु करण्यात आली असुन प्रकल्प माळशिरस ब अकलुज मधील १) मिनी अंगणवाडी सेविका रिक्‍त पदे १७ , ३) अंगणवाडी मदतनीस रिक्‍त पदे ७६ सोबत यादी जोडली आहे.

याप्रमाणे रिक्‍त पदाची भरती करण्या करिता सदर गावातील/नगरपंचायत/नगरपालिका मधील वय वर्षे १८ ते ३५ वर्षे व विधवाकरता ४० वर्षे या वयोगटातील किमान शैक्षणिक पात्रता १२ वी. उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) इच्छुक महिला उमेदवाराकडुन दि.०८/०५/२०२३ ते १९/५/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय माळशिरस व अकलुज, पंचायत समिती माळशिरस ता.माळशिरस येथे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी सदर गावातील इच्छुक महिला उमेदवारांनां संपुर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री.बालाजी आल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी माळशिरस अकलुज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button