महाराष्ट्र
कौठळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रुपाली नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
कौठळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रुपाली नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच निवड करण्यासाठी उपसरपंच संदीपान मारकड सदस्य राणी मारकड,नंदा चोरमले, दिक्षा काळेल, सुनील खामगळ, बापू चितारे पाठिंबा दिला. त्यानंतर रुपाली पाटील यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया इंदापूर तालुका अध्यक्ष हामा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत मारकड, सुभाष पिसाळ,भारत चोरमले, शहाजी खामगळ, कालिदास पाटोळे, मोहन पवार, अशोक राऊत, आण्णा काळेल, प्रमोद चितारे, अशोक मारकड, रमेश काळेल, आबा मारकड, ज्ञानदेव खामगळ, भिवा मारकड, गुणवंत मारकड, संतोष खांडेकर, भारत मारकड, सोमनाथ पिसाळ, सुनील मारकड, वसंत पिसाळ, विनायक जाधव, दिपक माने, किरण माने व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.




