शहा धारसी गॅस एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करा बहुजन ब्रिगेड महासंघाची विभागीय आयुक्तांकडे मागणी

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780
माळशिरस तालुक्यात गॅस वितरण करणारी शहा धारसी गॅस एजन्सी ही गॅस कनेक्शन धारक ग्राहकांकडून वितरण शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीर नियमा पेक्षा अधिकची रक्कम घेऊन सर्वसामान्यांची लुट करीत असलेबाबत तसेच घरपोच सेवा असतानाही घरपोच सेवा दिली जात नसलेबाबतची तक्रार तहसीलदार माळशिरस यांना साधारणपणे 180 दिवसांपूर्वी तक्रार देऊन सुध्दा तहसिलदार माळशिरस यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने

याउलट त्यांनी राजरोसपणे सदरच्या एजन्सी ला जणु अभय देऊन पाठीशी घातल्याने याविरोधात दि 19एप्रिल 2023 रोजी बहुजन ब्रिगेड महासंघाचे वतीने विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांना निवेदन देण्यात आले असुन कारवाई न झाल्यास आपल्या प्रशासनाच्या विरोधात संघटनेच्या वतीने उग्र व तीव्र स्वरुपाचे जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे सदरचे निवेदन बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहिते तसेच उपाध्यक्ष गणेशभाऊ साठे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.जिल्हाधिकारी सोलापूर व तहसिलदार माळशिरस हे सर्वसामान्यांना दिलासा देणार का असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होत आहे.



