शहर
पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट तेजल ठाकूर तर उपाध्यक्षपदी सौ.ॲडव्होकेट संयुक्ता तामोरे यांची बिनविरोध निवड

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर बार असोसिएशनच्या 2023-24 च्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.ही निवड बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी झाली असून या बार असोसिएशनच्या 2023-24 च्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट तेजल श्याम ठाकूर तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सौ. संयुक्ता संजय तामोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर सहसचिव पदी ॲडव्होकेट धनंजय काशिनाथ लोखंडे तर ग्रंथालय अध्यक्षपदी ॲडव्होकेट नगीना अंजुम सय्यद व कार्यकारणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट चंदन ज्ञानेश्वर किणी व ॲडव्होकेट वंदना पंजाबराव गायकवाड यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच पालघर बार असोसिएशनच्या सचिव पदाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट प्रिया चंद्रसेन वडराईकर या 108 अशा बहुमताने विजयी झाल्या आहेत.



