मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा परिषद शाखेच्या वतीने “इफ्तार पार्टी ” संपन्न.

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
मराठा सेवा संघ जिल्हा परिषद सोलापूर शाखेच्या वतीने रमजान महिन्याच्या निमित्ताने मुस्लिम बांधवा साठी जिल्हा परिषद येथील शिवरत्न सभागृहात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचा वारसा जपत सर्व धर्म समभाव,या प्रमाणे समाजात सलोखा निर्माण व्हावा , आणि या माध्यमातून सामाजिक एकता ,भाईचारा अबाधित रहावा यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

जिल्हा परिषद मधील मुस्लिम बांधवांना (अधिकारी व कर्मचारी) आमंत्रित करून प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्या हस्ते( रोजेदारांना) रमजान चे उपवास करणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी आदिंना फळं, स्वीट पदार्थ देऊन आजचा उपवास सोडण्याचा कार्यक्रम (इफ्तार पार्टी) संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशानंद शेळकंदे सहाय्यक लेखा अधिकारी कुंभार साहेब, मराठा सेवा संघाचे पुणे विभाग अध्यक्ष उत्तम राव माने , जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब पाटील,शहर अध्यक्ष पवार सर,माढा तालुका अध्यक्ष निलेश देशमुख सर, ग्रामसेवक संघाचे सचिव प्रताप गवळी भाऊसाहेब,व इतर पदाधिकारी. कर्मचारी उपस्थित होते




