K G N ग्रुप माळीनगर यांच्या वतीने इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न.

माळीनगर—प्रतिनिधी
रियाज मुलाणी 9921500780
माळीनगर तालुका माळशिरस येथील सुन्नी मदिना मज्जिद माळीनगर सवतगाव या ठिकाणी दि १९ रोजी K G N ग्रुप माळीनगर यांच्या वतीने इफ्तार पार्टी सोहळा सायंकाळी ठीक ७.०० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समस्त मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र महिना रमजान चालू असून यानिमित्ताने मुस्लिम बांधवांचे मोठ्या प्रमाणात (रोजा) उपवास असतात सालाबाद प्रमाणे यावर्षीही सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांन साठी ग्रुपच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.रमजानचा महिना सुरू असल्यामुळे आवर्जून सर्व जाती धर्मातील बंधूनाही कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी अनिल लोंढे, माळीनगर ग्रामपंचायत सदस्य विराज निंबाळकर ,माळीनगर मा सरपंच अभिमान जगताप,प्रदीप निंबाळकर, तिकोटे गुरुजी,अभिजीत वाजाळे, विशाल वाजाळे ,आकाश कांबळे, भैया कांबळे , संतोष कांबळे, पप्पू कांबळे, राज जगताप, हमिद शेख, सिद्धू शिरतोडे, या मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या गावातील समस्त हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद व आनंद घेतला.
याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख,उपाध्यक्ष जब्बार तांबोळी ,सचिव सलीमभाई शेख, लायकभाई सय्यद,KGN ग्रूप अध्यक्ष शरीफ काझी,उपाध्यक्ष रियाज मुलाणी,अब्दुलरोफ शेख, मोहसीन शेख, बाजीगर शेख, नजिर तांबोळी,नवाज शेख, अरमान मुलाणी,असलम सय्यद, पिंटू काझी,कादर तांबोळी, अल्ताफ मुलाणी,साजिद तांबोळी,शाहरुख शेख,सर्व KGN ग्रुप सदस्य आदीनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.



