शहर
सफाळे टेंभीखोडावे रस्त्यावर बेवारस गाडीचा अपघात…..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभी खोडावे या रस्त्यावर असलेल्या मोरीच्या अरुंद ठिकाणी एका अज्ञात गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला आहे.

ही गाडी अज्ञात व्यक्तीची असून या गाडीचा मालक ही गाडी रात्री या रस्त्यावर बेवारस पणे सोडून गेला आहे.
MH-01-3573 असा या गाडीचा नंबर असून ही पांढऱ्या रंगाची गाडी आहे. ही गाडी रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी रात्री त्यावेळी या रस्त्यावरून खाली उतरलेली आहे..

मात्र या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली दिसत नसली तरीही अज्ञात गाडी कुणाची आणि या गाडीचा मालक या गाडीला बेवारसपणे या रस्त्यावर का सोडून गेला असा प्रश्न या गावातील नागरिकांना भेडसावत आहे.



