शहर

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमाला 10,75 500 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात जेरबंद करण्यात नालासोपारा पोलिसांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क. पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030416640.

नालासोपारा येथे अंमली पदार्थ व गुंगीकारक औषधी द्रव्याची विक्री करणाऱ्या इसमाला अटक करून त्यांच्या ताब्यातील 10 लाख 75 हजार 500 रुपयांचा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक व दहशतवादी विरोधी पथकाला यश आले आहे.

सोमवार दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 रोजी नालासोपारा पोलीस ठाणे पश्चिम हद्दीत एका बुलेट गाडीवरून एक अज्ञात इसम अंमली पदार्थ व गुंगीकारक औषधी द्रव्याची विक्री करत आहे.

अशी गोपनीय माहिती नालासोपारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांना प्राप्त झाली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त- मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त- श्रीकांत पाठक, सुहास बावचे- पोलीस उपायुक्त, राजेश मोकाशी – सहायक पोलीस आयुक्त नालासोपारा यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा, सचिन कोतमिरे पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा नालासोपारा ), सहायक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर नालासोपारा पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक पंडित मस्के, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, वैभव पवार, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंखे, पोलीस नाईक अमोल तटकरे, पोलीस अंमलदार बनसोडे, कल्याण बाचकर, आकाश पवार, प्रेम घोडेराव या पथकाने सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी सापळा रचून शिताफिने रफिक अन्सारी वय वर्ष (47) याला त्याच्या ताब्यातील 7 लाख 70 हजार 500 रुपये किमतीचे मेफंड्रॉन अमली पदार्थ, तसेच 1 लाख 40 हजार 500 रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटा, व 1 लाख 60 हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची मोटर सायकल असा एकूण 10 लाख 75 हजार 500 रुपयांच्या मुद्दे मला सह त्याला रंगेहात अटक करून जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button