शहर
मी आंबेडकर वादी सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी निवासस्थानी व नंतर संघटनेच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. नंतर संघटनेचे राज्य सचिव अनिल केंगार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी आयोजित केलेल्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला नंतर इंदापूर तालुक्यातील चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या वालचंदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जयंती महोत्सवात साजरे करण्यात आले. नंतर नऊदारे येथे येऊन बुध्दविहारात जाऊन तथागत गौतम बुद्धांना वंदन करून व काटी येथील नवयुवकांच्या ज्योतीचे प्रस्थान करण्यात आले. त्यानंतर लासुर्णे राजवाडा येथील जयंती महोत्सवात सहभागी होऊन अन्नदानाचा आस्वाद घेतला... त्यानंतर महामानवाच्या जयंती महोत्सवाचे अवचित साधून ठेवलेल्या डॉ. राजेश कांबळे यांच्या दिर्घायु हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होऊन सदिच्छा दिल्या.... नंतर कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर दोन कार्यकर्त्यांच्या घरी गोडधोडाचा आस्वाद घेतला.... याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव अनिल केंगार संघटनेचे संपर्क प्रमुख नागेश भोसले संघटनेचे राजशिष्टाचार समिती सदस्य आप्पासो कदम, संघटनेचे बबलु वंचाळे हे उपस्थित होते.




