शहर

दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या वतीने माळीनगर – सवतगाव मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे संपन्न.

माळीनगर—प्रतिनिधी
रियाज मुलाणी

 माळीनगर तालुका माळशिरस येथील सुन्नी मदिना मज्जिद माळीनगर सवतगाव या ठिकाणी दि १२ रोजी ती सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या वतीने इफ्तार पार्टी सोहळा सायंकाळी ठीक ६.३० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सध्या समस्त मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र महिना रमजान चालू असून यानिमित्ताने मुस्लिम बांधवांचे मोठ्या प्रमाणात (रोजा) उपवास असतात याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहुन राजेंद्र गिरमे यांनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांच्या सणावारामध्ये सहभागी होऊन शुभेच्छा देत असतो हा बंधुभाव असाच टिकला पाहिजे  आज आपल्या देशात समता एकता अखंडता बंधुता सामाजिक सलोखा राखण्याची गरज  असल्याचे सांगत त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गावातील समस्त हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद व आनंद घेतला मुस्लिम बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  शिरीष फडे, मिलिंद गिरमे, महादेव बंडगर, रिंकू राऊत, निलेश एकतपुरे, सर्व स्थानिक पत्रकार  गोपाळ लावंड, गणेश गेजगे, सुरेश गंभीरे, मोसिन शेख, भैय्या माढेकर , नितीन कांबळे, संजय दळवी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, जब्बार तांबोळी, सलीम शेख, लायक सय्यद, शरीफ काझी, रियाज मुलाणी, इकबाल जमादार मौलाना मैनुद्दीन पठाण, सादिक शेख, वसीम शेख, इस्माईल शेख, रमजान इनामदार, सिकंदर शेख, असलम सय्यद, अब्दुलरोफ (बबलू)शेख, जावेद पठाण, नवाज शेख, मोसिन शेख, महंमद शेख, शौकत शेख, पिंटू काझी, अकबर तांबोळी, बाजीगर शेख, आदी हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button