बार्शी विभागामध्ये उत्कृष्ट विज वसुली केल्या बद्दल वांगी शाखेचा द्वितीय क्रमांक आणि रोहित्र नादुरुस्त कमी करण्यात जेऊर उपविभागचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
दिनांक 10-4-2023 रोजी सोलापूर जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी उत्कृष्ट काम केलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील विज अभियंताचा गुणगौरव माननीय अधीक्षक अभियंता सांगळे साहेब कार्यकारी अभियंता कुऱ्हाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी जेऊर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री अतुल गलांडे साहेब वांगी शाखेचे सहायक अभियंता श्री अशोक काळे साहेब जेऊर शाखेचे अभियंता अमोल चंदनशिव साहेब साडे शाखेचे नागेश साळुंखे साहेब यांच्या गुणगौरव करण्यात आला वांगी शाखेची वसुली करण्यासाठी श्री भुजंगराव सुळ साहेब, श्री औदुंबर कोल्हे साहेब,श्री नंदकुमार कुमार (पप्पू) उघडे साहेब, श्री जावेद पठाण साहेब, श्री दादा कांबळे साहेब, श्री सुभाष राऊत साहेब,श्री समाधान पाटील साहेब,

श्री ऋषिकेश इंगोले साहेब,श्री उमेश जावळे साहेब,श्री सुरज मुंडे साहेब यांनी परिश्रम घेतले जेऊर उपविभाग तर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले जेऊर विभागातील वीज वितरण कंपनीतील उत्कृष्टरित्या काम केलेल्या सहाय्यक अभियंता अशोक काळे व उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष ग्राहकांमधून अभिनंदन होत आहे



