माळशिरस येथे फुले – आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अकलूज–प्रतिनिधी
डी.एस.गायकवाड
माळशिरस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माळशिरस येथील सिद्धार्थ नगर येथे महामानवांच्या जयंतीचे साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शुक्रवार दिनांक १४ एप्रिल रोजी प्रभात फेरी झेंडावंदन नालंदा बुद्ध विहार येथे झेंडावंदन बुद्ध पूजा व याच दिवशी स्नेह भोजनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रम, आटपाडी येथील नानासाहेब पिसे यांचा अंधश्रद्धे वरील कार्यक्रम, दिनांक १६ रोजी बार्टी विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक रविवार १७ रोजी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कवितेची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १८ सोमवार रोजी जयंती पिक्चर, १९ रोजी शुभांगी शिंदे- मी सावित्री बोलतेय दि २० रोजी विविध गुणदर्शन ग्रुप डान्स शो, दि २१ रोजी फलटणचे सुप्रसिद्ध जादूगार गोगा यांचा कार्यक्रम तर दि २२ रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. सदर कार्यक्रमांचे आयोजन जयंती महोत्सव समीती माळशिरस व नालंदा बुध्द विहार ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती महोत्सव समिती व नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.



