शहर

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सहा पान दुकानदारावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उपसंपादक——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.. 97 30 867 448

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 6 इसमांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक, हिम्मत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग डॉ. बसवराज शिवपूजे अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड अकलुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिनाक ६ एप्रिल २०२३ रोजी ११.०० ते १३.३० वा. या कालावधीत पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी, समीर पठाण, विशाल घाटगे, सिध्दनाथ कंटोळी यांचे पथकाने आरोपी 1) सतिश अशोक भोंगळे रा.राहुल पानशॉप यशवंतनगर, २) महेश भारत भोंगळे रा. मे भारत पानशॉप यशवंतनगर, ३) दशरथ पांडुरंग नाळे रा. रणधैर्य पान शॉप यशवंतनगर, ४) लालासाब मकबुल शेख रा. लाला पानशॉप, सदाभाऊ चौक अकलुज, ५) महामुद शब्बीर शेख रा. पुष्पक पानशॉप श्रीराम टॉकिज समोर अकलुज, ६) विलास जगन्नाथ दोरकर रा.महर्षि पानशॉप, प्रतापसिंहचौक अकलुज ता. माळशिरस हे चालवत असलेले पानशाॕपचे दुकानामध्ये विमल पानमसाला, सुगंधी तंबाखू, आर.एम.डी.पानमसाला, सुकामावा, राजू सुपारी, रजनीगंधा पानमसाला, मिराज सुगंधीत तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ असे ३३,५९०/रुपयाचा व तो मानवाचे जिवीतास धोका निर्माण होणारा प्रतिबंधीत गुटखा माल स्वत:चे आर्थिक फायदयासाठी विक्री करण्यासाठी मिळून आले आहेत.

सदर आरोपीविरुध्द प्रज्ञा प्रमोद सुरसे, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी दिलेले फिर्यादीवरुन अन्न सुरक्षा व मानदे कायदयातील शिक्षापात्र कलम २६ ( २ )( i ), २६(२)( ii ),२६(२)(iv),२७(३)(e),३०(२)(a),५९ व भा. द. वि. सं. क. १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक सुनिल जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button