कण्हेरी ता. खंडाळा जि.सातारा येथील सर्फराज पटेल यांचा प्रामाणिक पणा बँक खात्यावर आलेले 50 हजार रु.दिले परत

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 40
हल्लीच्या काळात सर्वत्र बँकिंग व्यवहार ऑनलाइन झाले असून या ऑनलाइनचा फटका एखाद्या नागरिकाला बसत असतो कारण ऑनलाईन खात्यावर पैसे पाठवताना खाते नंबर मध्ये एखादा अंक जरी चुकला तरी ती रक्कम ज्या व्यक्तींना पाठवायचे आहे त्यांना न जाता दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होते त्यामुळे ते खात्यावरील पैसे परत मिळतील का या विवंचनेत तो नागरिक असतो परंतु जगात आजही काही प्रमाणात प्रामाणिकपणा असल्याने उस्मानाबाद येथील एका अधिकाऱ्यांनी ऑनलाइन रक्कम पाठवली ती रक्कम ज्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवायची होती त्या व्यक्तीच्या खात्यावर न जाता कन्हेरी ता .खंडाळा जि. सातारा येथील “सरफराज जमीर पटेल” यांच्या खात्यावर जमा झाली
फोन पे वर पेमेंट करत असता नंबर चुकीचा enter झाला व खात्यावरून 50,000 अमाऊंट दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली .ह्या अकाउंट ची माहिती घेतली असता सदर तरुण 11वीत शिकणारा ‘सर्फराज जमीर पटेल’राहणार कन्हेरी ता खंडाळा जि सातारा युवकाच्या खात्यावर जमा झाली.सर्फराज शी संपर्क साधला असता त्याला चुकून हि रक्कम तुमच्या खात्यावर आली असे सांगितले नंतर सर्फराज पटेल म्हणाला कि पैसे माझ्या खात्यावरा आले आहेत मी दोन दिवसांपूर्वीच नवीन बँक खाते उघडले आहे त्यामुळे माझ्याकडे अद्याप ए.टी.एम. नाही तर तुम्ही इकडे या तुम्हला बँकेतून 50 हजार रु. काढून पैसे रिटर्न करतो असं सांगितले
आणि सरफराज ने . ही बाब त्याच्या वडिलांना जमीर पटेल याना सांगितली त्यांनीही ज्या व्यक्ती चे पैसे आपल्या मुलाच्या खात्यावर आले त्या व्यक्ती ला कॉन्टॅक्ट करून सांगितले कि काही काळजी करू नका तुम्हाला तुमची सगळी रक्कम परत करतो असे सांगत माणुसकी काय असते हे दाखवून दिले आज रोजी सर्फराज चे वडील जमीर पटेल यांनी बँकेत जाऊन संपूर्ण रक्कम एन एफ टी केली.त्यांचा हा प्रामाणिक पणा मनाला खूप भावला . आणि मनात कोणत्याही प्रकारे पैशाचा मोह न ठेवता 50 हजार रुपये संपूर्ण रक्कम परत केली
त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून सरफराज पटेल ‘यांनी कुटुंबातील संस्काराचा धडा जगासमोर दाखवून दिला अशा या’ सरफराज पटेल यांचे टाइम्स 9 मराठी न्यूज चैनल च्या वतीने” हार्दिक आभिनंदन”
Very Proud of you सर्फराज जमीर पटेल
प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे..



