आदिनाथ साखर कारखान्याच्या कायदेशीर सल्लागार पदीएडवोकेट शिरीष लोणकर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कायदेशीर सल्लागारपदी एडवोकेट शिरीष लोणकर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत झाली आहे
राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे माहिती प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी दिली आहे
आदिनाथ कारखान्याच्या थकबाकीदार लोकांकडे असलेली वसुली करण्याचे मुख्य आव्हान एडवोकेट लोणकर यांच्या पुढे आहे
कारखाना स्टोर मधून झालेल्या चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अजून मुद्देमाल जप्त केलेला नाही याबाबत पाठपुरावा करावा लागणार आहे
आदिनाथ कारखान्याच्या चिकलठाण जेऊर जवळा आधी सह पाच ठिकाणी मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सुरक्षित करण्याची जबाबदारी आहे
आदिनाथ कारखान्याची जवळपास 14 ते 15 कोटी रुपयांची बाकी वाहतूकदार कंत्राटदार व्यापारी व संचालक मंडळाच्या नातेवाईकांकडे आहे वसुलीची व कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा मोठी आव्हान आहे
आदिनाथ कारखान्याच्या यार्ड मधून चोरी गेलेल्या बैलगाड्या व त्यांचे अक्सल याचा तपासी बाकी आहे



