शहर
माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सूचनेनंतर अकलूज मटन मार्केट परिसरातील अस्वच्छतेवर तात्काळ कारवाई – नगरपरिषदेचा स्वच्छतेला प्रारंभ.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूजमध्ये अलीकडील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी शहरातील विविध भागांना भेट दिली. यादरम्यान अकलूज मटन मार्केट शेजारील परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. तत्काळ जनतेच्या समस्येची दखल घेत सातपुते यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे आदेश दिले.

सातपुते यांच्या सूचनेनंतर अकलूज नगरपरिषदेनं त्वरित कारवाई करून परिसराची स्वच्छता केली. नागरिकांनी या जलद प्रतिसादाचे समाधान व्यक्त केले असून, “समस्या दिसताच उपाययोजना करणारे नेतृत्वच खरी जनसेवा करत आहे,” अशा शब्दांत लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली.



