महाराष्ट्र
धनगर समाज बांधवांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट

इंदापूर प्रतिनिधी समिर शेख टाईम्स 9 मराठी न्यूज
धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गतून आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबत इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यावेळी या मागणीस हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला व धनगर समाज बांधवांच्या समावेत चर्चा केली.

तसेच धनगर समाज बांधवांच्या या मागणीला पाठिंबा असल्याचे पत्र व हा निर्णय तातडीने घ्यावा याकरिता हर्षवर्धन पाटील यांनी विनंती पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावे या शिष्टमंडळाकडे सुपूर्त केले.



