महाराष्ट्र

शंभो महादेवाच्या चैत्री यात्रेसाठी मानाच्या कावडी, धज व काट्यासह लाखो भाविकांना चहा, जेवणावळींची परीसरातील ग्रामस्थांकडून सोय

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

शिखर शिंगणापूर (जि. सातारा ) येथील शंभो महादेवाची चैत्र महिन्यातील यात्रा शनिवार १ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी छत्रपतींचे वंशज राजेभोसले कुटूंबीयांच्यावतीने महादेवाची महापूजा होवून यात्रेला सुरुवात होते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रसह मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातून मानाच्या कावडी, धज व काट्यासह लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच मानाच्या कावडी व धजींची भेट यात्रेदिवशी शंभो महादेवाशी होत असते.

“शंभो शिवा पार्वती हर हर महादेवच्या जयघोषात व गजरात राज्याच्या कानाकोपन्यातून लाखो भाविक आपल्या मानाच्या कावडी व धजी घेवून गुडी पाडव्यापासून पायी चालत चालले आहेत. यामध्ये गंगाखेड, परभणी, बीड, गेवराई, मंगरुळ, उस्मानाबाद, लातूर, औसा, केज बरोबर विदर्भ, मराठवाड्यातील गावातून महिला, पुरूष व अबालवृद्ध भाविक दररोज जवळपास ४५ ते ५० किलोमीटर पायी चालत आहेत. शनिवारी एकादशीनिमीत्त शंभो महादेवाची महापूजा करण्यात येते. त्याचदिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरते.

भाविकांना गावो- गावच्या नागरीकांच्यावतीने शरबत, चहा, नाष्टा, जेवणावळी देवून भावीकांची भक्ती केली जाते आहे. नरसिंहपूर येथील नीरा भिमा नद्यांच्या पवित्र संगमावर सर्रास भाविक अंघोळी करुन इंदापूर तालुक्यात प्रवेश करून नरसिंहपूर, बावडा, वालचंदनगर मार्गे फलटण तालुक्यात प्रवेश करुन शिखर शिंगणापूरला दर्शनास हजेरी लावतात. टणू गणेशवाडी, शिंदेवस्ती, बावडा, लाखेवाडी, रेडणी, निमसाखर गावातून जाणाऱ्या भक्तांच्या चहा, नाष्टा, शरबतची सोय केली होती. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा व ग्रामस्थाच्यावतीने मराठवाड्यातून येणारी विलास ढवाण यांच्या मानाच्या धजीला परंपरेप्रमाणे भाविकांना जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुनी मानाच्या कावडीला तर लातूर जिल्ह्यातील घोणसी येथील २१ वर्षांपूर्वीच्या जुन्या कावडीला शंकर व शहाजी बोडके कुटूंबियांच्यावतीने जेवणाची सोय करण्यात येत आहे.

चौकट – परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुनी मानाच्या कावडीला शिखर शिंगणापूर देवस्थानच्या वतीने ७२ हजार कावडी व ५००० काट्या पैकी एकादशी दिवशी धजाचा मान असतो असे माणिक प्रभाकर एकपट्टे महाराज यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button