महाराष्ट्र

माळीनगर येथील दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदी- प्रकाश गिरमे– उपाध्यक्षपदी -नितीन इनामके तर खजिनदारपदी पृथ्वीराज भोगळे यांची निवड

माळीनगर —प्रतिनिधी
रियाज–मुलाणी
मो. 9921 500 780

माळीनगर,ता.:येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या सचिवपदी प्रकाश हणमंतराव गिरमे यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपाध्यक्षपदी नितीन मुरलीधर इनामके व खजिनदारपदी पृथ्वीराज निळकंठ भोंगळे यांची वर्णी लागली आहे.

१९४२ साली स्थापन झालेली ही संस्था आहे.संस्थाध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या निवडी पार पडल्या.मावळते सचिव ऍड.सचिन बधे यांची मुदत संपल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी प्रकाश गिरमे यांना उपाध्यक्षपदावरून सचिवपदी बढती मिळाली आहे.प्रकाश गिरमे यांनी यापूर्वी शुगरकेन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.एमस्सी ऍग्री असलेल्या नितीन इनामके यांची खजिनदार पदावरून उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.तरुण संचालक पृथ्वीराज भोंगळे यांना खजिनदारपदी संधी मिळाली आहे.


१)प्रकाश गिरमे – चष्मा व पांढरा शर्ट
२)नितीन इनामके- चष्मा व चौघडा शर्ट
३)पृथ्वीराज भोंगळे- कोट व टाय घातलेले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button