शहर

साईबाबा सेवा ट्रस्ट संग्राम नगर च्या वतीने साई प्राणप्रतिष्ठा 26 व्या वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

श्री साई प्राणप्रतिष्ठा 26 व्या वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा सेवा ट्रस्ट संग्राम नगर अकलूज यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशी राजे धवलासिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात येणार असून याप्रसंगी श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आप्पासो उत्तम पवार व सोनाली आप्पासो पवार यांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलन होणार आहे.

सकाळी 10 ते 11/30 वाजेपर्यंत शिवशंभो भजनी मंडळाचे सामुदायिक भजन होणार आहे सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत साईबाबा ट्रस्ट व डॉक्टर निखिल आर्वे यांचे आर्वे हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लडप्रेशर ,शुगर’, थायरॉईड यांची मोफत तपासणी इंदापूर रोड अकलूज येथे होणार आहे तसेच दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज जयसिंह मोहिते पाटील व सुलक्षणादेवी जयसिह मोहिते पाटील ,यांच्या हस्ते संपन्न होणार आहे

याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , राम सातपुते ,डॉ.एम के इनामदार, स्वरूपा राणी मोहिते पाटील, संग्राम सिंह मोहिते पाटील, ऋतुजा देवी संग्रामसिँह मोहिते पाटील, श्रीराज नंदकुमार माने पाटील, राजवर्धिनीदेवी श्रीराज माने पाटील अजित विठ्ठल रेवंडे (सरपंच )आशा राजसिंह सावंत (उपसरपंच) ग्रामपंचायत संग्राम नगर ,तसेच सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी अकलूज व संग्राम नगर हे उपस्थित राहणार आहेत

दुपारी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी 7 वाजता धैर्यशील मोहिते पाटील व शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे. याप्रसंगी अर्जुन सिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेज सिंह मोहिते पाटील , देवन्यादेवी शिवतेज सिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह किशोरसिंह माने पाटील, युगंधरादेवी क्रांतीसिंह माने पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच रावसाहेब गुळवे, उदय टेके, मनोज रेळेकर ,सागर नेवसे, राहुल शिंदे, रोहन वेळापुरे, निखिल फुले, श्री व सौ जुनेजा, महेश खडके, तसेच लोकमान्य गणेशोत्सव मंडळ व शिवरत्न गणेशोत्सव मंडळ अकलूज, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, शिवगर्जना ग्रुप लोणार गल्ली अकलूज ,आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे

त्याचप्रमाणे सायंकाळी 4 ते 6 वा. पर्यंत ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ- माळीनगर ,यांचे भजन तर सायंकाळी 6/30 ते 9 वाजेपर्यंत समाज प्रबोधनकार श्री ह भ प जगन्नाथ खरात यांचे एकनाथी सोंगी भारुड संपन्न होणार आहे.तरी सर्व साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा शिवाय ज्यांना महाप्रसादासाठी शिधा द्यायचा असेल त्यांनी (तांदूळ ,गहू, गुळ, साखर डाळ तेल तूप ,)इत्यादी वस्तू अथवा रोख रक्कम देणगी देऊन पावती घेऊन सहकार्य करावे तसेच

सध्या H3 N2 या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व भाविकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करावे व मास्क वापरावे असे आवाहन साईबाबा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर 1) 98 50 797 490 2) 9975 123 324 3) 8888 724 533 4) 9822 301 115. या मो.नं.वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button