पालघर जिल्ह्यातील आगरी सेनेचे झुंजार नेते चंदुलाल घरत यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्ह्यातील आगरी सेनेचे झुंजार नेते चंदुलाल घरत यांनी पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान बहाल केल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य नागरी सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सफाळे विराथन बुद्रुक अभिनव विद्यालय चाफेवाडी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान मेघराज शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा पालघर जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती दामोदर पाटील भूषविणार आहेत. तर या सत्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून आगरी सेना प्रमुख तथा ओबीसी महामंडळाचे पहिले अध्यक्ष राजाराम साळवी आणि पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, व सोनोपंत दांडेकर पालघर कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित राहणार आहेत.



