शहर

वैराग ता.बार्शी येथील मदरसतुल अरबिया मधील 51 मुला मुलींनी कुरआनचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सन्मान सोहळा संपन्न

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज –मो. 97 30 867 448

वैराग ता.बार्शी जि.सोलापूर येथील मदरसतुल अरबिया जामिया रजविया हबीबिया जामा मस्जिद मधील 51 मुला मुलींनी कुरआनचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल शबे बारातच्या शुभ दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला असून या मदरसा मध्ये या पंचक्रोशीतील एकूण 110 ते 115 मुले मुली धार्मिक शिक्षण घेत असून त्यापैकी 51 मुला मुलींनी हे शिक्षण पूर्ण केले असून त्यामध्ये 32 मुली व 19 मुलांचा समावेश आला

कुरान वाचन करणे किंवा प्रत्येकाला कुराण वाचता यावे याला इस्लाम धर्मात व समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वर ईश्वराने टप्प्याटप्प्याने हे कुराण अवतरले असून प्रत्येक मुस्लिमांनी कुरान वाचन करणे अनिवार्य आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मुस्लिम पालक किंवा आई-वडील हे आपल्या मुलांना शैक्षणिक शिक्षणासह धार्मिक शिक्षण देत असतात

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहजादा-ए- हुजूर बशीरुजमा अल्हाज आसिफ रजा हे उपस्थित होते तसेच हजरत सोफी सरदार पाशा ,सय्यद यासीन कादरी (माणकेश्वर) मौलाना तहसीन रजा ,मौलाना वकार रजा ,मौलाना अब्दुल कादर बेग ,मौलाना अब्बास कादरी, कारी व हाफीज अब्दुल कादर, , मौलाना रमजान, मौलाना अब्दुल करीम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती

पुढील प्रमाणे;- (मुले) आरिफ शेख ,आयान पठाण, अवेज शेख, निहास पठाण, साद सय्यद ,आफताब शेख, मेराज सय्यद ,फरीद शेख ,मुदस्सर कुरेशी ,सोफियान पठाण ,आयान पठाण ,रिहान सय्यद ,रिहान मुजीब सय्यद ,अमन तांबोळी, वाहिद तांबोळी ,सुलतान पठाण, नवाज शेख , जिशान सय्यद,अल्तमश मुलाणी, (मुली)– सानिया शेख, सुहाना शेख ,साबिया शेख, तंन्जिला तांबोळी, महेक सय्यद, सिमरन शेख, सुहाना निसार शेख, आसमा शेख, महेक पठाण, इरम सय्यद ,तस्मिया मुलाणी, अंजुम शेख ,मुस्कान फकीर, आफरीन तांबोळी ,सोफिया सय्यद, सुहाना पठाण, सना शेख, सिमरन शेख, मुस्कान शेख, असीन शेख , आनम शेख, अल्फिया शेख ,उजमा मुलाणी, अल्फिया समीर शेख, आलिया शेख ,आयशा सय्यद , सय्यद , जरीन शेख ,जबीन मुलाणी, जोया फकीर, आलिया सरवर शेख, यांचा समावेश होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता मदरसतुल अरबिया जामिया रजविया हबीबिया जामा मस्जिद वैरागच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button