महाराष्ट्र

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समतानगर जिल्हा परिषद शाळेला ‘वॉटर प्युरिफायर’ भेट

​अकलूज: नगरसेवक विशाल मोरे यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सामाजिक बांधिलकी

Times 9 Marathi News Network

​अकलूज :अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरसेवक विशाल मोरे यांच्या वतीने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समतानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने शाळेला ‘वॉटर प्युरिफायर’ (पाणी शुद्धीकरण यंत्र) भेट देण्यात आले.

​या उपकरणाचे लोकार्पण स्वतः शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाढदिवसाचा बडेजाव टाळून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त वस्तू भेट दिल्याबद्दल शिवबाबा यांनी विशाल मोरे यांचे कौतुक केले.

शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आता पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.केवळ हार-तुरे न स्वीकारता जनहिताचे काम करण्यावर मोहिते-पाटील समर्थकांनी भर दिला आहे.

याप्रसंगी नगरसेवक विशाल मोरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य राहुल फुले, नगरसेवक सचिन देशमुख,नगरसेवक मिलिंद कोथमीरे, योगेश जामदार, नगरसेविका नम्रता जगताप, तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य राहुल जगताप, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक विशाल मोरे म्हणाले की, “शिवतेजसिंह बाबांचे नेतृत्व नेहमीच विकासकामे आणि समाजहित जोपासणारे राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील लहान मुलांना शुद्ध पाणी मिळावे, हीच आमची त्यांना खरी शुभेच्छा भेट आहे.”

​शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button