मराठा सेवा संघांचे संस्थापक पुरोषोत्तम खेडेकर यांची अकलूजला पत्रकार चांद शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

बी.टी.शिवशरण
पुरोगामी विचारवंत सामाजिक व विद्रोही समीक्षा याचे आत्मभन आणि जाण असलेले थोर नेते लेखक अभ्यासक सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी आज अकलूज येथे व्यासंगी पत्रकार व अकलूज येथून तीस वर्षांपूर्वी सामाजिक विचाराला बांधिलकी असणारे ग्रामीण भागात साप्ताहिक कसे असावे जण सामान्यांचे प्रश्न समस्या मांडण्यासाठी नव्या उमेदीने तितक्याच परखडपणे नई गस्त टाईम्स हे साप्ताहिक सुरु करुन पत्रकारितेला नवा आयाम देणारे जवळपास शेकडो वार्ताहर पत्रकार घडवणारे संस्थापक संपादक चांद शेख
यांच्या मुलाचे विवाह सोहळ्याला उपस्थित रहाता न आल्याने खेडेकर साहेब यांनी अकलूजला दुपारी पत्रकार चांद शेख यांच्या नूर मंझील या निवास्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी नूतन वधू वरांना शुभेच्छा देऊन सुयश चिंतीले खेडेकर साहेबांनी आज मनमोकळ्या गप्पा मारून अनेक विषयावर मनमुराद गप्पा मारल्या यावेळी त्यांना गस्त चे दिवाळी अंक भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ऍड तोशिफ चांद शेख यांनी खेडेकर साहेबांचा सत्कार करुन त्यांचे पुरोगामी विचार पुस्तके ग्रंथ जिजाऊ प्रकाशन या संस्था याबाबत चर्चा केली यावेळी पत्रकार चांद शेख यांनी खेडेकर साहेब अकलूजला माझ्या निवासस्थानी येऊन भेट दिल्या बद्दल त्यांचे ह्रदयस्पर्शी आभार व्यक्त केले



