शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा गावात मोकाट जनावरांचा उपद्रव; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवे गावात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.गायी, म्हशी, बैल, घोडे आणि कुत्री शेतात घुसून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रस्त्यावरही ही जनावरे मुक्तपणे वावरत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर म्हैस आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हिंदेश हाडळ गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हाडळ हे गरीब कुटुंबातील असून जगातील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य वनिता हाडळ यांचे पती होते. त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित होता; मात्र मृत्यूशी चाललेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, जनतेचा त्रास आणि अपघाताच्या घटनांना आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button