नाव रामाचे विचारधारा मनुवादी सातपुते यांचे हिंदुत्व फुले शाहू आंबेडकर यांच्या विरोधात

बी टी शिवशरणं
भाजपचे आमदार राम सातपुते हे माळशिरस विधानसभा या राखीव मतदार संघातून निवडून गेले आहेत त्यांनी जरी राखीव मतदार संघातून उमेदवारी मिळवली असली तरी ते निवडून येण्यापूरते त्यांचे मागासवर्गीय पण आहे फुले शाहू आंबेडकर हे प्रचार भाषण बोलण्यापर्यंत त्यांच्या जातीचा ते वापर करतात आणि ते स्पष्ट म्हणतात मीं सनातनी हिंदू आहे आमदार सातपुते तुम्हाला जर सनातनी असल्याचा जर एवढा अभिमान गर्व असेल तर त्याच सनातनी हिंदू धर्माने मागासवर्गीय लोकांना दीनदलितांना गाव कुसाबाहेर ठेवले होते त्यांची पाऊले उमटू नयेत म्हणून पाठीला खराटा गळ्यात गाडगे होते मंदिरात येऊ दिले जात नव्हते शिवा शिव पाळली जात होती गावातून जाताना पायताण डोक्यावर घेऊन जावे लागत होते कुत्र्या मांजराला किमत होती पण दलितांना किंमत नव्हती ही वाईट अमानवीय परंपरा कोणी बंद केली ज्या तेहतीस कोटी देवांना अगर कोणत्या धर्माला दलितांची दया आली नाही ते अशक्यप्राय काम डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान विज्ञान बुद्धी च्या कसोटीवर दलितांना स्वाभिमान हक्क स्वातंत्र्य माणुसपण मिळवून दिले हे करताना त्यांनी मनुस्मृती दहन केली रूढी परंपरा बदलून मानवता धर्म असलेला बौद्ध धर्म दिला

त्यांनी हिंदू धर्मातील सना तनी विचार परंपरा बदलून टाकल्या त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या असे असताना आमदार राम सातपुते म्हणतात मीं कट्टर सनातनी हिंदू आहे मग त्यांनी त्या धर्मातील दलितांना दिली जाणारी वागणूक म्हणजे गळ्यात गाडगे पाठीला खराटा बांधावा मंदिरात जाऊ नये खरकटे शिळे अन्न मागून खावे मेलेल्या माणसाचे कपडे वापरावे जर त्यांना आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्म मान्य नसेल तर वर नमूद केलेल्या तरतुदी प्रमाणे आचरण करावे काल त्यांच्या बोलण्यातील विधानसभेतील आक्रमकता व भाषा दारू पिऊन ओरडणाऱ्या पेक्षा कमी नव्हती
राम नाव असलेल्या सातपुतेची विचारधारा मनुवादी आहे



