अकलूज च्या निरा नदी काठी असलेल्या इदगाह मैदानाची साफसफाई आणि रंगरंगोटी सुरू…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
17 जून रोजी सबंध जग भरात साजरी होणाऱ्या बकरी ईद निमित्त अकलूज येथील निरा नदी काठी असलेल्या इदगाह मैदानाची साफ सफाई आणि रंग रंगोटी करून द्यावी अशी मागणी अकलूज येथील समस्त मुस्लिम समाजाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि युवा नेते शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या कडे केली होती…

मुस्लीम समाजाने केलेल्या मागणीची दखल घेत आणि तत्काळ पाठपुरावा करत युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज नगर परिषदेच्या मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याशी चर्चा करून मुस्लिम समाजाने केलेल्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते…

यावर लागलीच दखल घेत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी निरा नदी काठी असलेल्या मैदानाची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्याचे काम निविधा काढत सुरु केल्यामुळे अकलूज येथील समस्त मुस्लिम समाजाने मोहिते पाटील कुटुंबाचे आभार व्यक्त केले…



