भरधाव ट्रकला हात पकडून बाईक स्टंटबाजी करून रिल्स बनवणाऱ्या तरुणावर केळवा सागरी वाहतूक पोलिसांची कारवाई

केळवा रोड वार्ताहर विजय घरत
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रस्त्याने चाललेल्या भरधाव ट्रकला हात पकडून जीवाचा खेळ करून बाईक स्टंटबाजी करून रिल्स बनवणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणावर केळवा सागरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे .
बुधवार दिनांक 20 मे रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकुणसार आगरवाडी सफाळे रस्त्यावरून मातीने भरलेला एक ट्रक भरधाव वेगाने जात असताना एम एच -48- सी सी 7750 या दुचाकीचा मालक मनीष सुखदेव यादव वय वर्ष 26 राहणार वेढी नाका चटाळे (सफाळे) हा तरुण या ट्रकला हात पकडून आपली दुचाकी चालवत होता.व सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी व्हिडिओ रिल्स बनवत होता.

ही बाब केळवा सागरी वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यावर या बाईक स्वाराचा पाठलाग करून त्याला थांबून त्याच्यावर मोटर वाहन कायद्या अंतर्गत धोकादायक पद्धतीने वाहन चालून इतरांच्या जीवास धोका निर्माण करणे या कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षितपणे वाहने चालवावी असे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.



