१०७० झोपडपट्टी प्रश्नाला प्रशासन स्तरावर गती…भाजपा नगरसेवक महेश शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर नागरिक व लोकप्रतिनिधी कडून प्रस्ताव दाखल प्रक्रियेला सुरुवात..

Times 9 Marathi News Network
अकलूजमधील १०७० झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर हक्क मिळावा या मागणीसाठी भाजपा नगरसेवक मा. महेश शिंदे यांनी निवडणुकीनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वप्रथम हा प्रश्न अधिकृतपणे उपस्थित केला होता. त्यानंतर या विषयासंदर्भात सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

दिनांक १६/०३/२०२२ रोजी झोपडपट्टी परिसरातील सुमारे ८० कुटुंबांची अधिकृत माहिती प्रशासनाकडून मागविण्यात आली होती. पुढे दिनांक ०७/०२/२०२६ रोजी ई-मेलद्वारे पाठपुरावा करण्यात आला तसेच दिनांक ११/०२/२०२६ रोजी कायदेशीर निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत अकलूज नगर परिषदेकडून दिनांक २७/०२/२०२६ रोजी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे प्रस्ताव व कागदपत्रे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, सध्या ८० पैकी ७४ पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव पुढे सरकत असल्याची माहिती समोर येत असून या प्रक्रियेमुळे १०७० झोपडपट्टीवासीयांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

“हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीचा नसून गोरगरिबांच्या हक्काच्या घराचा आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढेही माझा पाठपुरावा सुरू राहील,” अशी भावना भाजपा नगरसेवक मा. महेश शिंदे यांनी व्यक्त केली.




