शहर

सफाळ्यातील 17 गावांना दिलासा.. खासदार डॉ.हेमंत सवरा आणि लोकप्रतिनिधी राजेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने करवाळे धरणाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

सफाळे परिसरातील करवाळे धरणावर अवलंबून असलेल्या सतरा गावांचा पाणीपुरवठा महावितरणाचे बिल न भरल्या कारणामुळे गेल्या आठ दिवस खंडित करण्यात आला होता. या बाबत पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि लोकप्रतिनिधी राजेश म्हात्रे यांनी महावितणाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून या बिलाचा 5% भरणा सफाळे पाणी कमिटीने केल्यामुळे करवाळे धरणाचा विद्युत पुरवठा गुरुवारपासून नियमित करण्यात आला आहे.आता या भागातील गावांना पुन्हा नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सफाळे महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा विजे अभावी बंद करण्यात आला होता यामुळे या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर भटकंती करावी लागत होती तर काही ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती.

सदर पाणीपुरवठा योजना थकित वीजबिलामुळे बंद करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत असताना हा सामाजिक प्रश्न सोडवणुकीसाठी पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा अणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी उंबरपाडा सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश म्हात्रे यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. व त्यांनी माकणे, टेंभीखोडावे, मांडे- विठ्ठलवाडी, विराथन बुद्रुक, जलसार या गावच्या सरपंच व उपसरपंच यांना एकत्र आणून संबंधित विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येकी ग्रामपंचायतीने पंचवीस हजार रुपये आणि सफाळे पाणी कमिटी जमा खात्यातून अडीच लाख रुपये असा पाच लाख रुपयांचा भरणा केल्यावर महावितरणाने विद्युत पुरवठा 26 मार्चपासून नियमित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button