शिवजयंती निमित्त पालघर जिल्ह्यातील विराथन खुर्द येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातील विराथन खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी विराथन खुर्द येथे या गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच राजश्री सदानंद किणी यांच्या हस्ते पार पडला या प्रवेशद्वाराला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.

हा पंधरा लाख रुपये किमतीचा महाराजांच्या नावाचा प्रवेशद्वार लोक सहभागतून उभारण्यात आला आहे.
या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विराथन खुर्द गावात भव्य रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि विचारांचे स्मरण करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद पालघर माजी बांधकाम सभापती सुरेश तरे, वेढी ग्रामपंचायत सरपंच नचिकेत पाटील, टेंभीखोडावे उपसरपंच धनेश गावड, ग्रुप ग्रामपंचायत मांडे-विठ्ठलवाडी सरपंच महेंद्र पाटील, विराथन बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच अंजली किणी, माकणे सरपंच प्रमोद शेलार, जलसार ग्रामपंचायत सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विंकोश म्हात्रे तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



