महाराष्ट्र

सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा डिकसळ पुलाचा मार्ग झाला मोकळा निविदा झाली अंतिम आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नाला अखेर यश

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिश कालीन कोंढार चिंचोली डिकसळ फुलाची निविदा अंतिम झाली असून आता या पुलाचा मार्ग मोकळा झाला असून बरेच दिवसापासून या भागातील नागरिकांची या पुलाच्या उभारणीसाठी मागणी होती

तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने तात्काळ या फुलाला 50 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी मिळाली होती दरम्यान कोरोनाच्या काळानंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे या निधीला स्थगिती मिळाली होती परंतु आमदार संजय मामा शिंदे तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे याला यश आले असून बुधवार दिनांक 23 मे रोजी या पुलाची निविदा विजय पटेल कंपनी या एजन्सीला मिळाली असून 38 कोटी 66 लाख 31 हजार 470 रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती अकलूज येथील कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी दिली

या निर्णयामुळे करमाळा आणि इंदापूर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे डिकसळ पूल म्हणजे सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा दुवा असून पुलाचे काम लवकरच मार्गी लागल्यानंतर दळण वळण वाढणार आहे यावेळी अकलूज येथे आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र धांडे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड सुहास गलांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button