महाराष्ट्र

राजकारणातील दोन दिग्गज आज पुण्यात एकत्र…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी, टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

आज देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार साहेब यांची पुणे येथील निवासस्थानी धाराशिव चे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार कैलास पाटील यांच्यासह सदिच्छा भेट घेतली..!

धाराशिव च्या लोकसभा निवडणुकीत मा.पवार साहेबांनी प्रत्यक्ष सभा, बैठका घेऊन आशीर्वाद दिले होते. त्यामुळं महायुतीच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करण्याचे काम मोठ्या प्रमाणात उभं राहिलं1

मा.उद्धवसाहेब ठाकरे,मा.शरदचंद्र पवार साहेब, मा राहुलजी गांधी यांनी महाविकास आघाडीची बाजू जनतेच्या दरबारात भक्कमपणे मांडून महायुतीचा पराभव करण्यात आपल्याला यश मिळवून दिलं आहे. म्हणून च हि सदिच्छा भेट घेतली असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटले आहे…

हुकुमशाही कडे झुकलेल्या भाजपचे धोबीपछाड करण्यासाठी महाविकास आघाडीला दिलेल्या पाठबळा बद्दल मा.शरदचंद्र पवार साहेबांचे आभार मानत आणि भावी राजकीय जीवनासाठी आशीर्वाद व मार्गदर्शन घेत हि भेट कायम स्मरणात राहण्यासारखी झाली असे हि शेवटी ओमराजे निंबाळकर म्हणाले..!

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button