महाराष्ट्र

नवी दिल्लीत रंगला ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ सोहळा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती

​टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

राजधानी नवी दिल्ली येथे आज ‘लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड २०२४-२५’ आणि ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ या अत्यंत मानाच्या कार्यक्रमाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली.

​या कार्यक्रमादरम्यान देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांशी खासदार मोहिते पाटील यांनी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांचा समावेश होता.

​या दिमाखदार सोहळ्यात लोकमत समूहाचे राजेंद्र दर्डा आणि विजय दर्डा यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या अनौपचारिक भेटीत देशातील सध्याची राजकीय स्थिती, सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या व्यासपीठावर उपस्थित राहून राष्ट्रीय स्तरावरील धोरणकर्त्यांशी विचारांची देवाणघेवाण केली, जी त्यांच्या मतदारसंघातील आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

​लोकमत समूहातर्फे दरवर्षी संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांचा ‘पार्लमेंटरी अवॉर्ड’ देऊन गौरव केला जातो. या सोहळ्याला देशभरातील विविध पक्षांचे नेते, विचारवंत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button