महाराष्ट्र
खंडाळी अकलूज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत माहिती कक्षाचे उद्घाटन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स. 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
खंडाळी अकलूज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आज दिनांक 14 जून 2023 बुधवार रोजी प्रवेश सत्र 2023 बाबत प्रवेश सूचना देण्यासाठी माहिती कक्ष याचे उद्घाटन समारंभ पार पडला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गट निदेशक तथा प्रभारी प्राचार्य मा. मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी निदेशक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी आणि माहिती घेण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि पालक तसेच संस्थेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा वेळी माननीय अध्यक्ष यांनी सर्व ट्रेड ची माहिती सांगून मुलांना प्रवेश घेण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन निदेशक बडदाळे सर यांनी केले.



