महाराष्ट्र

अनेक दिवसांची प्रतिक्षा आणि “शिवबाबा” नीं घेतलेला तो निर्णय…

प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क,अकलूज मो.नं.= 9890299499

आपल्या भागात पावसाची सरासरी तशी जेमतेमच,परंतु अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्या सह व्यापारी वर्गाच्या तोंडचं पाणी पळालेलं,त्यात सणसुद आणि लग्नसराई ची रेलचेल चालू झालेली…आणि अखेर ती “प्रतिक्षा” संपली अन् अकलूज सह परिसरात ढग दाटून आलेले…

आणि काल संध्याकाळ पासून वरुण राजाचं दर्शन व्हायला सुरूवात झाली,अकलूज व परीसरात पावसाने अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केली,पाऊस “धो” म्हणून कोसळत होता आणि आपल्याला आठवते ते अकलूजचे ओढे कायम तुंबून भरून वाहणारे काठावरील घराघरांत पाणी शिरून होणारी नुकसान… पण या दोन तीन वर्षांत नाही घडलं अस काही,खळखळून पाणी सगळं निरा माईत विसावले…

कारण वारंवार येणार्या आस्मानी सकंटावर तत्कालीन सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याचे मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्यातुन अकलूजच्या दोन्ही ओढ्याच खोलीकरण व रुंदीकरण करून घेतले…नाहीतर या वर्षीचा पाऊस घराघरांत धुडगूस घालूनच थांबला असता…
धन्यवाद बाबा..वेळीच “निर्णय” घेत आज जनसामान्यांना दिलासा दिलात…

अकलूजच्या प्रत्येक चौकात C C TV कॅमेरे बसवून गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे काम असो किंवा माता भगिनी चें पाणी भरण्यास होणारी ओढाताण पाहून अकलूज मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम या सर्व कामांचे नियोजन शिवबाबांचेंच…

शिवबाबांचे नेतृत्त्व कणखर झाले तो काळ म्हणजे COVID 19 चा काळ…सबंध गावात सॅनिटायझर फवारणी असो किंवा गर्दीचे ठिकाण असणारे भाजी मंडई चे विभाजन करणे असो असे अनेक निर्णय शिवबाबांचेंच…

कोरोना काळात बंधू किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या साथीने व “आनंदभावी समाज सेवा” मंडळाच्या वतीने अकलूज मधील कुटुंबांना शिधा वाटप केली…

तसेच अकलूज मधील मेडिकल,दवाखाने,शेती उपयोगी सर्व अत्यावश्यक सेवा व दूधाचे योग्य नियोजन करून मा श्री शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या नेतृत्त्वाचा ठसा जनमानसात उमटवला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button