महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणूका जाहीर…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

बहुप्रतिक्षित नगर परिषद/नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली असून,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काल,दि. 4 नोव्हेंबर 2025 पासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच आदर्श अशी आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली असून,संबंधित नगर परिषदेच्या (आणि गरजेनुसार संपूर्ण जिल्हा/तालुका) क्षेत्रात ही लागू राहील…

गेल्या सात आठ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने स्वतःला “भावी नगरसेवक” म्हणून मिरवणाऱ्या अनेकांची यातून सुटका झाली असून येत्या 10 नोव्हेंबर पासून भावी नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे,17 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल तर 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होईल,25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल आणि महत्वाचे म्हणजे 2 डिसेंबर ला मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला…

आदर्श आचारसंहितेमुळे ‘या’ गोष्टींवर आले निर्बंध

निवडणूक प्रक्रिया स्वच्छ,पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ही आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची असते,आचारसंहिता लागू झाल्यामुळे खालील बाबींवर निर्बंध आले आहेत…

धोरणात्मक निर्णय : नगर परिषदेला (आणि राज्य शासनालाही) कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.

विकासकामांची घोषणा/सुरुवात : नवीन विकासकामांची घोषणा करणे किंवा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यास बंदी आहे.जी कामे प्रत्यक्ष सुरू आहेत,ती मात्र सुरू ठेवता येतील.

शासकीय वाहनांचा गैरवापर : निवडणूक कामाशिवाय अन्य राजकीय हेतूसाठी शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही.

प्रलोभने : मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणत्याही वस्तू,पैसा,मद्य किंवा भेटवस्तूंचे वाटप करण्यास सक्त मनाई आहे…

सभा आणि मिरवणुका: सभा किंवा मिरवणुका घेण्यासाठी पोलिसांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
______

महाराष्ट्रात जिथे जिथे नगर परिषद,नगर पालिका आणि नगर पंचायती आहेत त्या सर्वच ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले,भावी नगरसेवक आप आपल्या तयारीला लागल्याचे दिसून आले…

टाइम्स 9 न्यूज लवकरच माळशिरस तालुक्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या प्रभागातील उमेदवारांचा आढावा घेणार असून पक्षातून निवडणूक लढवणारे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे संभाव्य उमेदवारांची टाइम्स 9 न्यूज मुलाखत घेणार असल्याची माहिती संपादक नौशाद मुलाणी यांनी सांगितले…

सदरच्या निवडणुकीचा “आँखो देखा हाल” टाइम्स 9 न्यूज प्रेक्षकापर्यंत पोहचविणार आहे,या साठी संबंधित सर्व “भावी नगरसेवक” यांनी टाइम्स 9 न्यूज शी संपर्क साधावा,असे आव्हान देखील संपादक नौशाद मुलाणी यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button