शहर

पालघर जिल्ह्यातील जलसार ग्रामपंचायत हद्दीतील 5 एकर जागेतील जलाशयाला प्रशासनाचा हिरवा कंदील..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम भागातील विटी लाईन विभागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता जलसार ग्रामपंचायत हद्दीत 5 एकर जागेवर जलाशय खोदण्यात येणार आहे या प्रस्तावाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे हा जलाशय खोदून पूर्ण करण्यासाठी जलसार ग्रामपंचायत आणि शिवराय कन्स्ट्रक्शन कंपनी जयत तयारीला लागली आहे.

सफाळे भागातील जलसार ग्रामपंचायतीच्या कांद्रेभुरे, गोरठण, दारशेतपडा, खोडावेपाडा या आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.या भागात जलाशय,धरणे, तलाव उपलब्ध नसल्यामुळे फेब्रुवारी ते जून या कालावधीत या भागातील विहिरी आणि बोरवेलचे पाणी संपत असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसार ग्रामपंचायत सरपंच साक्षी गावड आणि उपसरपंच विंकोष म्हात्रे आणि सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी ग्रामसभेत त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील वनविभागाच्या म्हसणवट पाच एकर जागेत डिसेंबर 2025 मध्ये जलाशय खोदण्याचा प्रस्ताव बहुमताने पास करून स्वप्निल किणी यांच्यामार्फत प्रशासनाकडे पाठवला होता.

या प्रस्तावाला फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासनाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता हा जलाशय जलसार ग्रामपंचायत आणि शिवराय कन्स्ट्रक्शन यांच्याकडून खोदण्यात येणार आहे.या कामाला आता सुरुवात करण्यात येणार आहे. जून 2026 पर्यंत हा जलाशय खोदून पूर्ण झाल्यास भविष्यात या भागातील पाणीटंचाई प्रश्न दूर होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button