शहर

प्राध्यापक नादिल शेख “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

🎯 महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 सोहळ्यात नादिल शेख यांचा विशेष गौरव

शेळगाव जुनिअर कॉलेज शेळगाव (R) ता बार्शी,जिल्हा सोलापूर या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्यापन करत असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक यांना रिजनल teacher organisation दापोली यांचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संजयजी काशिद सर यांचे कडून पुणे या ठिकाणी जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करत असलेले प्रा.नादिल शेख याना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे…

हा आदर्श पुरस्कार फक्त माझा नसून,आई~वडील,भाऊ,बहिण,पत्नी,मुलगा,मुलगी….

संस्थेचे अध्यक्ष बाबा गायकवाड सर,सचिव लक्ष्मणरावजी गायकवाड सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी च्या सहकार्यामुळे मी माझे कार्य चांगले करत गेलो,त्यामुळे सर्वांना मी अर्पण करीत आहे…

हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना,मिळालेला एक सन्मान आहे…

प्राध्यापक नादील शेख यांचे सर्व मित्र परिवार,शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलेले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या…

कार्याचा गुणगौरव

प्राध्यापक नादील शेख फक्त शिक्षण क्षेत्रातच नसून त्यांच्या कार्याचा दबदबा संशोधन,प्रभावशाली शिकवण्याची पद्धत,प्रशासनामध्ये असणारी पकड,शिक्षकांना आलेल्या अडचणी सोडवणे,उत्तम शेती कशी करावी,एकादे काम हाती घेतल्यानंतर तडीस नेल्याशिवाय न थांबणारे अशी ओळख असलेले अष्टपैलू अंगी असणारे व्यक्तिमत्व यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.नक्कीच या महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारमुळे प्राध्यापक नादील शेख याना अजून विद्यार्थ्यांची,शिक्षकांची सेवा करण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे…

या वेळी प्रमुख पाहुणे नंदकुमार रामहरी गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन,पुणे हे उपस्थित होते,तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद,उपाध्यक्ष भरत पाटील,कार्याध्यक्ष संजय खटके,सचिव विशाल निकम,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन बेर्डे आणि शाहू बाबर सर उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button