“उद्योग महर्षी” उदयसिंह मोहिते पाटील यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणार…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
शिवरत्न उद्योग समूह,शिवशंकर बझार अकलूज आणि श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था,आनंदनगर अकलूज चे संस्थापक “उद्योगमहर्षी” उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…
“उद्योग महर्षी” उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे असेल
श्री क्षेत्र आनंदी गणेश आनंदनगर येथील “शक्ती स्थल” येथे उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या समाधीस बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 09:00 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे…

तद्नंतर शालेय गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप कार्यक्रम
सकाळी-9:30 वाजता
स्थळ- “शक्तिस्थल” आनंदनगर येथे
आनंदी गणेश मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शुभहस्ते विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य व मोहिते-पाटील परिवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे…
सकाळी 9:45 वाजता
स्थळ- श्री क्षेत्र आनंदीगणेश मंदिर पार्किंग परिसर आनंदनगर.



